पिंपरी – विधानसभा निवडणूकीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी, २०५ चिंचवड विधानसभा कार्यालय व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघातर्फें सांगवी येथील प्रा.बा.रा घोलप महाविद्यालयामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनी येत्या विधानसभा निवडणूकीत मतदान करण्याबाबत शपथ घेतली. मतदार यादीत नव्याने सामाविष्ट झालेल्या एक विद्यार्थी व एक विद्यार्थीनींनी उपस्थित विद्यार्थ्यांना मतदानाकरीता शपथ दिली. उपस्थित विद्यार्थ्यांना स्वत: मतदान करून मतदानाची जास्तीत जास्त जनजागृती करावी, असे आवाहन प्राचार्य डॉ.नितीन घोरपडे यांनी केले. याप्रसंगी २०५ विघानसभा मतदार संघाचे नोडल ऑफीसर अण्णा बोदडे उपस्थित होते. कार्यक्रमास महाविद्यालयाचे कार्यालय अधिक्षक हरी सोळंकी, प्राध्यापिका नेहा राशिनकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. तर आभार महाविद्यालयाच्या प्राध्यापिका वंदना पिंपळे यांनी मानले.