पिंपरी चिंचवड – आगामी विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. शहरातील 37 बूथ संवेदनशील असल्याचा अहवाल तयार करण्यात आला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्यास सुरवात केली आहे. तसेच शहरात येणाऱ्या वाहनांची नाकाबंदीही केली जात आहे. तसेच यापूर्वी झालेल्या निवडणुकांमधील घटनांची नोंद घेत शहरातील 31 मतदान केंद्रांवरील 37 बूथ संवेदनशील असल्याचा अहवाल तयार केला आहे. हा अहवाल निवडणूक विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे समजते.

मावळ विधानसभेचा देहूरोड ते तळेगाव पर्यंतचा भाग पिंपरी चिंचवड आयुक्‍तालयाशी जोडला गेला आहे. या भागातील तीन बूथ पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील असल्याचे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे.

संवेदनशील बूथ म्हणजे ज्या बूथवर यापूर्वी अनुचित घटना घडल्याची नोंद आहे, संख्याबळानुसार सापंद्रायिक तणावाची शक्‍यता आहे, राजकीय वैमनस्य असलेल्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे, इतर केंद्रांपेक्षा अधिक मतदान झाले आहे किंवा ज्या बूथवर एकाच उमेदवाराला 75 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाले आहे अशा बूथना संवेदनशील बूथ म्हटले जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here