पिंपरी चिंचवड –  “महात्मा गांधींच्या 150 व्या जन्म शताब्दीनिमित्त चिंचवड येथील ओम प्रतिष्ठान संचलित वंडरलॅन्ड स्कूल येथे ०२ ऑक्टोबर २०१९ रोजी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. स्वच्छतेचा हा उपक्रम राबविताना महात्मा गांधींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करण्याचा संदेश देण्यात आला. तसेच “ना गंदगी करेंगे, ना करने देंगे” अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. या अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाल्याचे शिक्षकांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या उक्ती व कृतीतून परिसरातील जनतेला स्वच्छ भारत अभियानाचा संदेश दिला आहे. रस्ते साफ करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, शौचालयांची स्वच्छता व निरोगी वातावरण यासाठी हाती झाडू घेणे हा संदेश स्वच्छ भारत अभियानातून देण्यात आला. “ईश्वराचे दुसरे रुप म्हणजे स्वच्छता” असेही विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता सावंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here