पिंपरी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे भाजपमधून बाळासाहेब ओव्हाळ यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे. दरम्यान, बाळासाहेब ओव्हाळ यांचे नगरसेवक पद रद्द करण्याबाबत विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.

पिंपरी विधानसभा मतदारसंघ राखीव आहे. महायुतीतून हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आहे. याच मतदारसंघात ओव्हाळ यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांच्यावर भारतीय जनता पक्षाने कारवाई केली आहे. बंडखोरी केल्याने त्यांच्यासह राज्यातील आणखी चार जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here