पिंपळनेर – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शुभदा अरुण बच्छाव हिने राज्यस्तरीय शालेय तेंग-सु-डो क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदक मिळविले. दि.११ ऑक्टोबर २०१९  रोजी पिंपळनेर येथे राज्यस्तर शालेय तेंग-सु-डो क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यात, १९ वर्ष मुलींच्या ५९ वजन गटात ही कामगीरी केली. तिच्या या यशाने प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे नाव उंचावले असून स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या नावलौकिकात भर पडली आहे.

      शुभदा बच्छाव हिच्या या यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. तिला क्रीडा प्रशिक्षक वैभव सोनवणे, नितीन राजपूत, संजय जमदाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. आगामी क्रीडा स्पर्धांमध्येही अधिक परिश्रम घेवून उच्च कामगीरी करणार असल्याचे शुभदा हिने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here