पिंपरी | पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते युवासेना पिंपरी विधानसभेच्या पदाधिका-यांनी तयार केलेल्या कार्यअहवालाचे प्रकाश आज शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
युवासेनेचे विस्तारक वैभव थोरात व जिल्हासंघटिका सुलभा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आंदोलन, उपोषण, भ्रष्टाचार विरोधात वेळोवेळी आवाज उठविणे, सामाजिक कार्य, ह्या सर्व गोष्टी कार्यअहवालात समाविष्ट आहेत. महायुतीचे उमेदवार आमदार गौतम चाबुकस्वार ह्यांच्या प्रचार सभेला पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आले होते.
यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेत्या नीलम गोरे, खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना संपर्कप्रमुख बाळा कदम, रघुनाथ कुचीक, जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, कामगार नेते इरफान सय्यद, शहरप्रमुख योगेश बाबर, पिंपरी संपर्क प्रमुख गिरीश सावंत, नगरसेविका मीनल यादव, अश्विनी चिंचवडे, अमित गावडे, प्रमोद कुटे, युवासेना जिल्हा सन्मवयक जितेंद्र ननावरे, युवासेना मावळ तालुका प्रमुख अनिकेत घुले उपस्थित होते. अहवाल प्रकाशनचे नियोजन युवतीअधिकारी प्रतिक्षा घुले व विभागसंघटक निलेश हाके यांनी केले.