पिंपरी :- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास करण्याची धमक आणि दृष्टी आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडेच असल्याने त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहून या निवडणुकीत जगताप यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार रहाटणी येथील नागरिकांनी केला.
नखाते वस्ती, रहाटणी येथे जगताप यांच्या प्रचारानिमित्त कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीचे नियोजन स्विकृत नगरसेवक संदीप नखाते यांनी केले होते. सायंकाळी सात वाजता झालेल्या या सभेत शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी अत्यंत उत्साही वातावरणात लक्ष्मण जगताप यांचे स्वागत उपस्थितांच्या वतीने करण्यात आले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना जगताप यांनी रहाटणीच्या विकासाचा वेग पुढील काळात आणखी वाढविण्याची ग्वाही दिली. तसेच नागरिकांच्या कल्याणासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी सहकार सेलचे अध्यक्ष सुनील कुंजीर यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. कार्यक्रमास नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते, निर्मला कुटे सविता खुळे, सुनीता तापकीर, बाबा त्रिभुवन, स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, चांगदेव नखाते, सखाराम नखाते, राजेंद्र नखाते, श्रीराम नखाते, अरूण तांबे, विनोद चौधरी, अंकुश कोळकर, प्रदीप दळवी, विजय नखाते, सुरेश शिंदे, विकास थोपटे, गुलाब सुक्रे, रमेश इथापे, सोमनाथ कापसे, देवीदास तांबे, गणेश नखाते, किशोर नखाते, विठ्ठल नखाते, गणेश गोडांबे, मनोज नखाते, गणेश नखाते, आदेश नखाते, दिपक जाधव, शिवाजी खुळे, कुलदीप नखाते, सचिन काळे, किरण नखाते, अमित नखाते, अभिजीत सरमाने, मयुर शिनगारे, निलेश फुलसौदर, किरण केसवड, सचिन तुपे, अमित गोडांबे, हरिभाऊ भवर, अमर पठारे, किशोर पठारे, प्रशांत जगताप, विठ्ठल सदानंदे, संतोष नखाते, निलेश कदम, महादेव डोळस, शुभम नखाते, योगेश आवटे, विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, वस्ताद ग्रुप, काळभैरवनाथ कबड्डी संघ, अमृतवेल मित्र मंडळ, गणराज मित्र मंडळ, रहाटणी महिला मंचाचे पदाधिकारी, सदस्य व रहाटणीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.