पिंपरी – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांना महाड-पोलादपूर तालुका समाज सेवा संघ, पिंपरी-चिंचवड विभागाने पाठिंबा जाहीर केला आहे. आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा सगळीकडे विकास झालेला आहे. त्यांच्या विकासात्मक नेतृत्वामुळे निवडणुकीत त्यांना पाठिंबा जाहीर करत असल्याचे संघाचे अध्यक्ष गणेश मालुसरे यांनी सांगितले.

कोकणातील महाड आणि पोलादपूर तालुक्यातील नागरिक चिंचवड मतदारसंघात वास्तव्याला आहेत. या नागरिकांनी एकत्र येऊन महाड-पोलादपूर तालुका समाज सेवा संघाची स्थापना केली आहे. या संघाच्या वतीने गुरूवारी (दि. १७) आमदार जगताप यांना पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष गणेश मालुसरे, कार्याध्यक्ष रविंद्र भोसले, उपाध्यक्ष अविनाश उतेकर, सचिव गणेश मोरे, खजिनदार प्रभाकर निकम आदी उपस्थित होते.

संघाचे अध्यक्ष गणेश मालुसरे म्हणाले, “लक्ष्मण जगताप हे चिंचवड मतदारसंघाचे दहा वर्षे आमदार राहिले आहेत. त्यांनी मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा करून ही दहा वर्षे सार्थकी लावली आहेत. या मतदारसंघात आता शास्वत विकास करण्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्याच नेतृत्वाची खरी गरज आहे. त्यामुळे ते पुन्हा आमदार व्हावेत यासाठी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे मालुसरे यांनी सांगितले.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here