चिंचवड – दुकानाच्या पत्र्यावर चढल्याच्या कारणावरून तरुणास लोखंडी पाइपने मारहाण करण्यात आली. ही घटना चिखली येथे गुरुवारी (दि. 17) घडली. चॉंद अमीरहसन शेख (वय 28, रा. हरगुडेवस्ती, चिखली) असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी शुक्रवारी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रोहित माने (रा. चिखली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपनिरीक्षक भारत चपाईतकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी हे कुत्र्याच्या पिल्लांना खायला घालण्यासाठी पत्र्यावर चढले होते. याचा राग आल्याने आरोपी रोहित याने चॉंद यांना लोखंडी पाइपने मारून जखमी केले. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.