पिंपरी चिंचवड – जिल्हा निवडणुक कार्यालय,पुणे आणि 205 चिंचवड विधानसभा मतदारसंघातर्फे स्वीप उपक्रमांतर्गत शहरात मतदारांसाठी माहिती पुस्तिका वितरीत करण्यात आल्या आहेत. वंडर कार प्रा.लि.,एम.आय.डी.सी. येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी निवडणुक प्रक्रियेची माहिती दिली. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच मतदारांसाठी माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी वंडर कार प्रा.लि.चे मनुष्यबळ व्यवस्थापक प्रकाश सोनी व कर्मचारी उपस्थित होते.