साक्रीतील कर्मवीर नगरात गोरगरिब वस्तीतील लोकांना कपडे, फराळाचे वाटप
साक्री – प्रचिती प्री प्रायमरी स्कूल, साक्री येथे गुरुवारी दि. २४ सप्टेंबर १९ गुरूवार रोजी पाच दिवसांचा दिपावळी हा सण धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. स्कूलचे चेअरमन चेअरमन प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिपोत्सवाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या प्रतिमा पूजनाने झाली. तसेच, पाचही दिवसांचे महत्त्व विविध छोट्या छोट्या नाटिकांद्वारे मांडण्यात आले. यावेळी, सणांचे औचित्त्य साधून विद्यार्थ्यांनी विविध देवींच्या वेशभुषा साकारल्या. दिवाळी सण निमित्ताने शाळेच्या आवारात दिव्यांची आरास, आकाश कंदील, रांगोळी याद्वारे शाळेची सजावट करण्यात आली. तसेच दिवा सजावट, भेटकार्ड, आकाश कंदील सजावट स्पर्धा घेण्यात आली. शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी यांनी दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या.
दिवाळी सण निमित्ताने गोरगरीब ( कर्मवीर नगर, साक्री) वस्तीतील लोकांना फराळ आणि कपडे वाटप करण्यात आले. यावेळी वस्तीतील लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. कार्यक्रमासाठी सुंदर अशी रांगोळी काढण्यात आली. तसेच फलक लेखन करण्यात आले होते. शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, प्राचार्य अतुल देव, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता नेरकर यांनी केले. संयोजन श्वेता रौंदळ व वैशाली खैरनार यांनी केले.