चिंचवड दारू पिल्यानंतर दोन मित्रांनी एकमेकांना शिवीगाळ केली. एकाने दुस-या मित्राला शाब्दिक वादात भाईगिरीची भाषा वापरली. यावरून मित्राने भाईगिरीची भाषा वापरणा-या मित्राला निर्जन ठिकाणी नेले आणि दगडाने ठेचून खून केला. ही घटना सोमवारी (दि. 28) रात्री हिंजवडीमधील आल्दीया इस्पानोला सोसायटीच्या मागच्या बाजूला घडली. या घटनेतील आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी चोवीस तासात अटक केली.

राजेश सुरेश राऊत (वय 34, रा. महाळुंगे, ता. मुळशी) असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे. त्याची पत्नी प्रिती राजेश राऊत यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सुधीर ओमपाल दुगलचे (वय 37, रा. काशीद पार्क, पिंपळे गुरव, सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री महाळुंगे गावातील आल्दीया इस्पानोला सोसायटीच्या मागच्या बाजूला खुनाचा प्रकार उघडकीस आला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हिंजवडी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट एक यांनी या प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला. गुन्हे शाखेने खून झालेल्या व्यक्तीची माहिती मागवली असता तो सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. चतुःशृंगी पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र राठोड, शिवाजी कानडे, अमित गायकवाड, प्रमोद लांडे, विजय मोरे, प्रवीण पाटील, गणेश सावंत, मारुती जायभाये, प्रमोद गर्जे, तानाजी पानसरे यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here