पिंपरी चिंचवड   रेल्वे मार्गावर पायाभूत सुविधांचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. मंकी हिल ते कर्जत रेल्वेमार्गाचे काम केले जाणार आहे. यामुळे पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वे वेळापत्रकात 1 ते 30 नोव्हेंबरपर्यंत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे काही गाड्यांचे मार्ग अंशत: बदलण्यात आले असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती पुणे रेल्वे विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पुणे ते मुंबई दरम्यान धावणा-या आठ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर दोन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. तर सुमारे दहा गाड्यांचे प्रारंभ आणि समाप्तीचे स्थानक बदलण्यात आले आहे.

यागाड्या रद्द

यामध्ये 12126 पुणे-मुंबई, 12125 (प्रगती एक्‍स्प्रेस) मुंबई-पुणे, 07617 नांदेड-पनवेल साप्ताहिक विशेष, 51027-मुंबई-पंढरपूर, 51028- पंढरपूर-मुंबई (पॅसेंजर) या गाड्या 30 नोव्हेंबरपर्यंत, 51029 मुंबई-विजापूर 27 नोव्हेंबरपर्यंत, 51030 विजापूर-मुंबई 28 नोव्हेंबरपर्यंत तर 07618 पनवेल-नांदेड साप्ताहिक विशेष रेल्वे 24 नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. तर,  पुणे-भुसावळ आणि भुसावळ-पुणे (भुसावळ एक्‍स्प्रेस) दौंड-मनमाडमार्गे धावणार आहेत.

पुण्यापर्यंत धावणार यागाड्या

मुंबईपर्यंत जाणाऱ्या कोल्हापूर-मुंबई, हुबळी-एलटीटी (कुर्ला), हैदराबाद-मुंबई, विशाखापट्टनम-एलटीटी, नांदेड-पनवेल या गाड्या पुण्यापर्यंतच धावणार आहेत. तर मुंबईतून सुरू होणारा मुंबई-कोल्हापूर, एलटीटी-हुबळी, मुंबई-हैदराबाद, पनवेल-नांदेड, एलटीटी-विशाखापट्टनम या गाड्यांचा प्रवास पुण्यातून सुरू होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here