पिंपरी  चिंचवड गावचे ज्येष्ठ नागरीक चंद्रकांत शिवराम डोके (वय 76 वर्षे) यांचे गुरुवारी (दि. 31 ऑक्टोबर) निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातू असा परिवार आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी महापौर व नगरसेविका अपर्णा निलेश डोके यांचे ते सासरे होत. चंद्रकांत डोके हे राज्य सरकारच्या नगररचना विभागातून सहाय्यक संचालक पदावरुन निवृत्त झाले होते. तसेच आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीची माजी विश्वस्त, पर्यावरण संवर्धन समितीचे कार्याध्यक्ष पदावर त्यांनी काम पाहिले होते. गुरुवारी सायंकाळी काळेवाडी पिंपरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शिक्षण, शेती, उद्योग, व्यापार, सहकार क्षेत्रातील हजारो नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here