अकोला – माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे आजारपणाने मुंबई येथे निधन झाले आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून अकोला 12 वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. मुंबईमधील रुग्णालयात त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.बाबासाहेब धाबेकरांनी कारंजा मतदारसंघातून अपक्ष म्हणून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामध्ये ते विजयी देखील झाले होते. १९९५ च्या विधानसभेत त्यांनी भाजप-सेना युतीला पाठिंबा केला. याचवेळी त्यांनी ४२ अपक्ष आमदारांचे नेतृत्त्व केले होते. युतीच्या सरकारमध्ये त्यांना राज्यमंत्रीपद देखील मिळाले. त्यांनी मनोहर जोशी आणि विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात काम केले होते. त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर अकोला येथून लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. तसेच ते तब्बल १२ वर्ष अकोला जिल्हा परिषदेचे सद्स्य देखील होते.