पिंपरी चिंचवड । पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयासाठी बेडशीट व वुलन ब्लँकेट खरेदी केली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मुंबई यांच्याकडून थेट पद्धतीने 51 लाख 26 हजार 750 रुपयांची बेडशीट व वुलन ब्लँकेट खरेदी केली जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी (दि. 13) होणार्‍या स्थायी समिती सभेसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे. पिंपरी, संत तुकारामनगर येथे महापालिकेचे 750 खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. या ठिकाणी औद्योगिकनगरीसह आजुबाजूच्या ग्रामीण भागातून तसेच राज्याच्या इतर भागातूनही हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. वायसीएमएच रुग्णालयासाठी दर करार पद्धतीने महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित मुंबई यांच्याकडून लिनन साहित्य (बेडशीट, वुलन ब्लँकेट) दर करारानुसार साहित्य खरेदी केले जाणार आहे. हे साहित्य करारनामा न करता थेट पद्धतीने खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी 51 लाख 26 हजार 750 रुपये खर्च येणार असून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here