पिंपरी मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला ईद ए मिलाद हा सण प्रेम, दया व त्यागाच्या शिकवणीचे स्मरण करुन शहरात मुस्लीम बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे उपस्थित होते.

मोहम्मद पैगंबर यांनी जगाला शांती आणि आणि मानवता याचा संदेश दिला. यामुळे आजच्या दिवशी नमाज पठण करून त्यांच्या सांगितलेल्या गोष्टी या जगापर्यंत पोहचविण्याचे काम करावे. त्यांची आठवण करून त्यांनी दिलेल्या शिकवणीचा अंगीकरण करण्याचा प्रयत्न करावा.  असे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले. केजीएन ग्रुप (डीलक्स चौक) वतीने सामुहिकरित्या अन्नदान करण्यात आले. यावेळी अल्लाबक्ष शेख, कौसर सय्यद, शम्मी पठाण, आलीम शेख, आसिफ मुलाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here