पिंपरी चिंचवड थेरगाव येथे दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी 70 हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली.  संदीप सूर्यकांत पाटील (वय 30, रा. कुणाल रेसिडन्सी, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 9) सायंकाळी साडेसात ते रविवारी (दि. 10) सकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान फिर्यादी पाटील यांचे घर कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून लाकडी कपाटातून 27 ग्रॅम वजनाचे 70 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here