पिंपरी :- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तलयातील वाहनांमध्ये आगामी काळात जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी चाचपणी सुरू केली आहे. जीपीएस थेट नियंत्रण कक्षाशी जोडल्याने नागरिकांना वेळेत मदत पोहचणे शक्य होणार आहे. शहरात कोठेही अनुचित प्रकार घडल्यास किंवा नागरिकांना मदत हवी असल्यास सर्वप्रथम पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क केला जातो.

त्यानंतर नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क करून माहिती दिली जाते. त्यानुसार गस्तीवरील पोलिस घटनास्थळी दाखल होतात. अनेकदा कॉलरला लोकेशन सांगता येत नाही. नेमके घटनास्थळ सांगता येत नसल्याने पोलिसांनादेखील पत्ता सापडत नाही. त्यामुळे पोलिसांना पोहचण्यास उशीर होतो.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलिस आयुक्त बिष्णोई यांनी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या धर्तीवर पोलिसांची सर्व वाहने जीपीएसद्वारे नियंत्रण कक्षाशी जोडण्याचा संकल्प केला आहे. या यंत्रणेमुळे पोलिस नियंत्रण कक्षाला प्राप्त झालेल्या कॉलचे लोकेशन पोलिसांना सांगणे शक्य होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here