पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ क ‘ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात आली. तसेच या मोहिमेत प्लास्टिकचा वापर करताना आढळून आलेल्या पाच व्यावसायिकांकडून पंचवीस हजार रुपये दंड आकारणी करून सुमारे एकवीस किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. स्पाइन रोड मोशी येथील स्पाइन माॅल परिसरातील सुमारे पंचवीस दुकानांची पाहणी आज करण्यात आली. क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेत सहाय्यक आरोग्य अधिकारी बी. बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम भोसले, आरोग्य निरीक्षक विजय दवाळे, राजेंद्र उज्जैनवाल, वैभव कांचनगौडार, सचिन जाधव यांच्या पथकाने प्लास्टिक जप्तीची कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here