पिंपरी | काळेवाडी येथील नवनाथ नढे यांच्या येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील काकडा आरती समाप्ती समारंभ नुकताच झाला. हभप पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा) यांचे काल्याचे किर्तन झाले.
यावेळी महाराजांचा सन्मान पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक संतोष कोकणे, नवनाथ नढे, नगरसेविका उषा काळे, नीता पाडाळे, नगरसेवक कैलास थोपटे, मच्छिंद्र तापकीर, स्विकृत सदस्य सखाराम नखाते, पै. विजय गावडे, विनोद तापकीर व परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.