पिंपरी | माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांच्या पुतळयास ह प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
सांगवी येथे झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या माई ढोरे, नगरसदस्य संतोष कांबळे, जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले, सहाय्यक आरोग्य अधिकारी ज्ञानेश्वर सासवडकर, मुख्य आरोग्य निरीक्षक अजय जाधव, संजय मानमोडे, सामाजिक कार्यकर्ते मनोहर ढोरे, कृष्णराव गिरगुणे, चंद्रकांत नांदे आदी उपस्थित होते.