साक्री – प्रचिती प्री प्रायमरी स्कूल येथे दि. १४ गुरूवार रोजी बालदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी सुंदर असे फलकलेखन करण्यात आले. यावेळी शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे उपस्थित होते.

     कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमा पूजन तसेच पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी, बालदिनाचे महत्त्व कवितेद्वारे पटवून देण्यात आले. प्रसंगी, पंडीत जवाहरलाल नेहरू यांची भूमिका पार्थ कांकरिया याने सादर केली. शाळेच्या प्राचार्या भारती पंजाबी यांनी बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या.  बालदिन निमित्ताने विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले. तसेच, बालकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विविध प्रकारचे खेळ घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करिष्मा देसले यांनी केले. अशाप्रकारे प्रचिती परिवारातील सर्व सदस्यांच्या सहकार्याने बालदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here