दापोडी   दरवाजाचे कुलूप तोडून तीन जणांनी एका तरुणाचे घरसामान रस्त्यावर फेकून दिले. ही घटना दापोडी येथे शनिवारी (दि. 16) सकाळी घडली. राजेश मनोहर स्वामी (वय 33, रा. शिवबा अपार्टमेंट, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नरेंद्र पांडूरंग भोई, पांडूरंग यांची पत्नी आणि मुलगा (सर्व रा. धनकवडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी स्वामी हे राहत असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील साहित्य रस्त्यावर फेकून दिले. नरेंद्र भोई यांनी पुन्हा माझ्या फ्लॅटमध्ये आला तर हातपाय तोडून पांगळा करेन, अशी धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here