पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुरदास गायकवाड यांचे गुरुवारी (दि.२१ रोजी) अल्पशः आजाराने निधन झाले आहे. जुने शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखले जात होते. फुगेवाडी प्रभागातून ते शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांच्या पत्नी संध्या गायकवाड यादेखील नगरसेविका होत्या.
सतत हसतमुख, मनमिळावू स्वभावामुळे शहरात त्यांचा मोठा मित्र परिवार होता. राजकारणाबरोबरच सामाजिक कार्यातही त्यांनी भरीव कामगिरी केली होती. त्यांच्या आज अचानकपणे झालेल्या निधनामुळे सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे. आज फुगेवाडी येथील स्मशानभूमीमध्ये ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.