पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या माई ढोरे विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या माई काटे यांचा ४० मतांनी पराभव केला. माई काटे यांना ४१ मते मिळाली. तर माई ढोरे यांना ८१ मते मिळाली. यात शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केले.
पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शान्तनु गोयल यांनी या निवडणूक प्रक्रियेचे पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
पिंपरी महापालिकेच्या सभागृहात आज विशेष बैठकीत ही निवडणुक पार पडली. सुरूवातीला पहिली पंधरा मिनिटे माघारीसाठी ठेवण्यात आला होता. त्यात राष्ट्रवादीच्या माई काटे यांनी माघार घेतली नाही. त्यामुळे झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या माई काटे यांना ४१ मते मिळाली. त्यांना शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील पाठींबा दिला. त्यानंतर भाजपाच्या माई ढोरे यांना ८१ मते मिळाली. अपक्ष आघाडीच्या नगरसेवकांनी त्यांना पाठींबा देत मतदान केले.
एकूण झालेले मतदान
माई काटे – (राष्ट्रवादी – ४१ मते) पराभूत
माई ढोरे – (भाजपा – ८१ मते) विजयी
००००००००