पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपमहापौरपदी भाजपाचे तुषार हिंगे बिनविरोध विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे राजू बनसोडे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणुकीतून शेवटच्या क्षणी माघार घेतली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शान्तनु गोयल यांनी या निवडणूक प्रक्रियेचे पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाची निवडणुक आज पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजू बनसोडे आणि भाजपाचे तुषार हिंगे यांच्यात लढत होणार होती. मात्र शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीच्या राजू बनसोडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे भाजपाचे तुषार हिंगे बिनविरोध विजयी झाले आहेत.
उपमहापौर पदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीच्या राजू बनसोडे यांची माघार..!
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या माई ढोरे यांनी एकतर्फी विजय मिळवला. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतली. राष्ट्रवादीचे उमेदवार राजू बनसोडे यांना पक्षाने शेवटच्या क्षणी माघार घेण्यास सांगितले. त्यावेळी मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन.. असं म्हणत बनसोडे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. दरम्यान या निवडणुकीत भाजपाचे तुषार हिंगे बिनविरोध विजयी झाले. मात्र निवडणुकीत राष्ट्रवादीच्या राजू बनसोडे यांनी ‘मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन..’ असे केलेलं विधान पालिका वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.