पिंपरी : विधान परिषद व महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अल्पावधीतच विकास कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे या दोन्ही आचारसंहितेच्या धास्तीनेच स्थायी समिती असू देत की महापालिकेची सर्वसाधारण सभा नगरसेवकांना विषय मंजूरीची घाई लागली आहे. याचाच परिणाम म्हणजे पिंपरी पालिकेची 20 ऑक्टोबरची सभा तीन दिवस आधी म्हणजे 17 ऑक्टोबरलाच होणार आहे. अवघ्या दोन महिन्यात विकास कामांना मंजुरी घेवून ती मार्गी लावणे हे सध्या नगरसेवकांसमोर मोठे आव्हान आहे. त्यात प्रभाग रचनेची सोडत जाहीर झाल्यानंतर सर्वांचा एकच गोंधळ उडणार आहे. एकीकडे प्रचार व दुसरीकडे कामाची घाई यात नगरसेवकांची चांगलीच कसरत होणार आहे. त्यामुऴेच ऐनवेळी विषयपत्रीकेवर करोडोंचे विषय आणले जात आहेत. व ते चर्चा न करताच एकमताने मंजूर होत आहेत. शेवटच्या टप्प्यात जेवढी जास्तीत-जास्त विकास कामे मंजुर करून घेता येतील याकडे सर्व पक्षांच्या नगरसेवकांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहेत. तर दुसरीकडे दोन महिन्यांसाठी का होईना विषय सभापतीपद मिळविण्यासाठीही सत्ताधारी नगरसेवकांची चांगलीच चढाओढ लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here