तिसरीचा अर्णव पाटील राष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धेत देशात दुसरा
साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे ऑगस्ट २०१९ मध्ये राष्ट्रीय रंगोत्सव स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण शनिवार दि. २३ नोव्हेंबर २०१९ करण्यात आले. या स्पर्धेत इ.३री तील विद्यार्थी अर्णव कपिल पाटील याला रंगभरण स्पर्धेत देशात द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्यामुळे नॅशनल सिल्वर अवार्ड देऊन गौरविण्यात आले. तसेच इ.८ वी तील देवयानी राजेंद्र देसले या विद्यार्थिनीने हस्ताक्षर स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला. तिला सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी विद्यालयातील १८ विद्यार्थ्यांना विविध पारितोषिके व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. यासह तब्बल ५० विद्यार्थ्यांना सुवर्णपदक व प्रशस्तीपत्रकाचे वितरण करण्यात आले. यावेळी, शाळेचे प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे, कलाशिक्षक भुपेंद्र साळुंखे, वैष्णवी थोरात यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांमधून राम सुतार, राजा रविवर्मा यासारखे कलाकार निर्माण व्हावेत. अशी अपेक्षा व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.