पिंपरी : यावर्षीच्या मार्केटची परिस्थिती पाहता रिअल ईस्टेट क्षेत्रातील मंदीचा काळ संपून तेजी आल्याचे दिसत चित्र आहे. ही तेजी आणखी काही दिवस अशीच राहील असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. दसरा-दिवाळीच्या मुहूर्तापासूनच घर खरेदीला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून त्यामुळे विकसकांनमध्येही उत्साहाच वातावरण आहे. दरम्यान, सणासुदीचा हंगामात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकसकही सरसावले आहेत.
क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया याबाबत म्हणाले की, घरांच्या किमती आता कमी होणार नसून स्थिर राहणार आहेत. ग्राहकालाही याची कल्पना असल्यामुळे ते आता किमती कमी होण्याची वाट न बघता घर खरेदी करण्यास प्राधान्य देत आहे. मागील तीन वर्षांपेक्षा या वर्षीचा हा सर्वात चांगला ‘फेस्टीव सीझन’ असेल. परिणामी ग्राहकांच्या चौकशीचे प्रमाणही वाढत आहे. ग्राहक या सणासुदीच्या काळात नक्कीच घर खरेदीचा निर्णय घेतील. सुट्टीच्या दिवशी बांधकाम प्रकल्पाला भेट देण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. गृह प्रदर्शनालाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here