साक्री – नाशिक विभागस्तर शालेय किक बॉक्सिंग क्रीडा २०१९-२० स्पर्धेत १९ वर्ष वयोगट मुली (वजन गट -४८) च्या गटात प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजची खेळाडू गायत्री अंकुश साळुंके हिने (प्रथम) क्रमांक पटकाविला. तिची राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. धुळे येथे दि. २५ नोव्हेंबर रोजी स्पर्धा पार पडली. या यशस्वी खेळाडूचे शाळेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी अभिनंदन केले. तसेच, तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. गायत्री हिने मिळविलेले यश हे स्कूलचा अभिमान उंचाविणारे असल्याचे श्री. पाटील यांनी मत व्यक्त केले आहे.
प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी , व्यवस्थापक वैभव सोनवण, तुषार देवरे, क्रीडा शिक्षक नितीन राजपूत, संजय जमदाळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.