आणि २६/११ च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली

पिंपरी चिंचवड – थेरगाव येथील प्रेरणा  विद्यालयात संविधान दिन साजरा झाला. यावेळी,  स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या माय भूमीच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे, तुकाराम ओंबाळे, मेजर संदीप उन्नीकृष्णन, शशांक शिंदे, बाळासाहेब भोसले, बापूसाहेब दुर्गुडे, प्रकाश मोरे, जयंत पाटील, विजय खांडेकर, राहुल शिंदे, अरुण चिट्टे, योगेश पाटील, अंबादास पवार, एन. सी. चौधरी, मुकेश जाधव या शहिदवीरांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

               याप्रसंगी प्राचार्य यशवंत पवार, मुख्याध्यापक महेंद्र पवार, पर्यवेक्षक  धनसिंग साबळे, अर्जुन शेटे, अशोक खताळ,  पांडुरंग दिवटे,  दिलीप माळी, भिमराव शिरसाठ,  दादा शेजाळ, राजेंद्र शिरसाठ, विजय जाधव, ज्ञानेश्वर बोरसे, अनिल नाईकरे, मोहन परहर, प्रवीण कुऱ्हाडे, पुरुषोत्तम पाटील, बिपिन देशमुख, सनी मळेकर, अरुणा यशवंते, संगीता दगडे, ज्योती धुरपते, अनिता कातुरे, सोनाली चौधरी, सुनिता धोंडगे,  अर्चना कदम, स्वाती  तपासे,  देवयानी वारके, रूपाली कदम, सुनिता राखुंडे, आशा शिंदे आदी  मान्यवर उपस्थित होते.

रेवती फडतरे या विद्यार्थिनीने संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. दत्तात्रय उबाळे यांनी  सूत्रसंचालन केले. ज्योती धुरपते यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here