जाहीर करण्याआधीच प्रभाग रचना माध्यमांकडे कशी ?
नगरसेवकांची मात्र आरक्षण सोडतीकडे पाठ
आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरक्षण सोडतीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. सभागृह भरले देखील होते. मात्र यामद्ये बोटवर मोजण्या इतपत नगरसेवक सोडले तर इतर नगरसेवकांनी मात्र आरक्षण सोडतीकडे पाठ फिरवली होती. यावेळी त्यांना आराखडा आधीच पोहचला होता ते कशाला येतील अशी खाजगीमध्ये चर्चा सभागृहात रंगली होती.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना नियमानुसार गुपित राहणे अपेक्षित होते. मात्र ही प्रभाग रचना, राखीव प्रभाग हे सारे महापालिका प्रसासानाने जाहीर करण्या आधीच माध्यमांमकडे कसे काय आले? याचा अर्थ प्रशासनाला हाताशी घेऊनच भाजप व राष्ट्रवादीने प्रभाग रचना बनवली आहे, असा जाहीर आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते मारुती भापकर यांनी प्रभाग आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमात महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्यावर केला.
राज्य निवडणूक आयोगाच्या नियमामुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले. मात्र त्या आधीच प्रभाग रचना काही माध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आली होती, प्रसिद्ध करण्यात आलेली प्रभाग रचना ही आज जाहीर केलेल्या प्रभाग रचनेशी तंतोतंत जुळत होती. त्यामुळे मारुती भापकर यांनी तेथेच आयुक्त दिनेश वाघमारे यांना ही प्रभाग रचना तर सकाळीच माध्यमांनी जाहीर केली. मग त्यांना ही माहिती कोणी दिली व तुम्ही म्हणता तशी ती कपोकल्पीतही नाही.
एवढी गुपित माहीती जाहीर झालीच कशी, याला कोण जबाबदार आहे व आपण यावर कारवाई काय करणार, असा सवाल उपस्थित करत अधिका-यांसोबतच ज्या माध्यमांनी हे वेळेआधी छापले त्या माध्यमावर व अधिकारी यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. यावर भाष्य करताना महापालिका आयुक्त म्हणाले की, याला प्रशासन जबाबदार नाही, तुमच्या तक्रारी तुम्ही 10 ऑक्टोबरच्या हरकती व सुचनांमध्ये मांडा, तक्रारीनुसार तपास केला जाईल व चौकशीही केली जाईल व दोषींवर कारवाई आम्ही करु, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here