दिवसाआड नियोजन करुनही अपुरा पाणी पुरवठा

पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहराला 25 नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरु आहे. मात्र, महापालिका अधिका-यांच्या नियोजनाअभावी अजूनही शहरभर अपुरा पाणी पुरवठा होत आहे. तसेच अनेक भागात गढूळ पाणी येवू लागल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे दिवसाआड पाणी पुरवठा करुनही जैसे थे परस्थिती असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण उशाला असूनही पिंपरी चिंचवडकरांच्या घशाला कोरड पडली आहे. काळेवाडी, थेरगाव परिसरात गढूळ पाणी पुरवठा होतोय, तर पिंपळे साैदागर, पिंपळे गुरव, वाकड, दिघीसह काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. दिवसाआड पाणी पुरवठा नागरिकांच्या तक्रारी कमी होण्याऐवजी वाढू लागल्याचे दिसत आहे.

वाढते शहरीकरण, लोकसंख्या वाढ आणि सुमारे 40 टक्के पाण्याची गळतीमुळे महापालिका पवना नदीतून दररोज 500 एमएलडी पाणी उचलूनही शहराला पाणी पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे दोन फेजमधील अमृत योजनेची कामे, आंद्रा, भामा-आसखेड प्रकल्पांची कामे तात्काळ सुरु करुन दोन वर्षात पाणी पुरवठा सुरळीत करणे अपेक्षित आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, याकरिता महापालिका पाणी पुरवठा विभागाला दोन महिन्याची मुदत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभेत दिली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने व्यावसायिक अनधिकृत नळजोडधारकांवर कारवाई सुरु केली आहे. गेल्या पाच दिवसात 50 नळजोडणी बंद करण्यात आली आहेत. तर अनधिकृत नळजोडणीचे सर्व्हेक्षण सुरु केले आहे. तसेच दोन महिन्यात घरगुती सर्व अनधिकृत नळजोडणी शोध मोहीम सुरु आहे. त्यांचे नळजोडणी अधिकृत करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here