पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने नोटीस देऊनही अनधिकृत बांधकाम न काढल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. सुनील देविदास कांबळे (रा. थेरगाव, पडवळनगर, वाकड), असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी उपअभियंता व्ही डी नाईक यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नाईक पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण येथे उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आरोपी कांबळे यांना 18 नोव्हेंबर 2019 रोजी अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस दिली. त्यानुसार डॉ. कांबळे यांनी त्यांचे अनधिकृत बांधकाम काढले अथवा हलवले नाही. याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here