पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दिनांक 2 ऑक्टोबर 2014 पासून स्वच्छ भारत अभियान सुरु करण्यात आले आहे. यामध्ये 1 ते 15 ऑक्टोबर या पंधरा दिवसाच्या कालावधीत सर्व क्षेत्रीय कार्यालये, शासकीय कार्यालये / इमारत आणि इतर सार्वजनिक संस्था मार्फत विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
यानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या परिसरात सकाळी आठ ते बारा या वेळेत मोकळ्या जागांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत आकुर्डी रेल्वे स्टेशन ते परमार पार्क, प्रभाग धर्मराज चौक येथे स्वच्छता मोहिमेमध्ये एकूण 92 कर्मचारी, घंटागाडी ठेकेदार आणि शरद मिसाळ, नंदाताई ताकवणे आणि एम.एम.शिंदे, सहाय्यक आरोग्याधिकारी यांचा सहभाग होता आणि एकूण 8.1 टन कचरा गोळा करण्यात आला.
तर ब क्षेत्रीय कार्यालयातील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह गावडे मेनशनचा शेजारील मोकळी जागा गणेशनगर व खिंवसरा पाटील मैदान, गुजरनगर व भगवती रॉयल सोसायटीजवळ अक्षय पार्क सोसायटीलगतचा मोकळा प्लॉट स्वच्छ करण्यात आला. एकूण 75 नागरिक व कर्मचारी यांनी सहभाग घेतला यामध्ये एकूण 5 टन कचरा गोळा करण्यात आला.
क क्षेत्रीय कार्यालयातही संतोषी माता चौक ते म्हसोबा मंदिर, महेशनगर समोरील मैदान, शनीमंदिर नवी सांगवी व अत्तार वीटभट्टी येथील मोकळे प्लॉट स्वच्छ करण्यात आले. एकूण 236 नागरिक व मनपा कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यामध्ये 3 टन कचरा गोळा करण्यात आला. तर ड क्षेत्रीय कार्यालयामध्ये वाय जंक्शन ते वाघजाई हॉटेल ते छत्रपती बँक ते सीएमई परिसर, वाघजाई हॉटेल ते मानकर चौक येथे ही मोहिम राबविली एकूण 42 नागरिक व महापालिका कर्मचारी यांनी सहभाग घेतला यामध्ये 2 टन कचरा गोळा करण्यात आला.
ई क्षेत्रीय कार्यालयामध्ये संतोषी धावडे वस्ती व एमआयडीसी येथील मोकळे प्लॉट स्वच्छ करणेत आले. एकूण 45 नागरिक व महापालिका कर्मचारी यांनी सहभाग घेतला. यामध्ये 5 टन कचरा गोळा करण्यात आला.
तसेच फ क्षेत्रीय कार्यालयामध्ये कृष्णानगर पूर्णानगर शनिमंदिर, येथील मोकळे प्लॉटची प्लास्टिक, केरकचरा व गवत इ. काढून मोकळे प्लॉट स्वच्छ करण्यात आले. महापालिका कर्मचारी संस्थेकडील एकूण 22 कर्मचारी यांनी स्वच्छता करून अंदाजे 1.05 मेट्रीक टन कचरा गोळा करण्यात आला. या बरोबरच फ क्षेत्रीयकार्यालयाचे अंतर्गत चिखली सीएनजी गॅस शेजारील भाजी मंडई येथील रिकाम्या प्लॉटची साफसफाई करण्यात आली. नागरिक व सामाजिक कार्यकर्ते इतर कार्यक्रमात सहभागी झाले होते. यामध्ये 1 मेट्रीक टन कचरा गोळा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here