पिंपरी :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ताथवडे प्रभाग भोर-वेल्हा विधानसभा मतदारसंघात जोडलेला आहे. परंतु महापालिकेच्या कुठल्याही निमंत्रण पत्रिकेत भोर-वेल्हा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम अनंतराव थोपटे यांच्या नावाचा समावेश केला जात नाही. राजशिष्टाचारानुसार आमदार थोपटे यांचे नाव यापुढे महापालिकेच्या सर्वच कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये टाकण्यात यावे अशी मागणी शिवसेना नगरसेवक निलेश बारणे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.

नगरसेवक निलेश बारणे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. परंतु पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने राजशिष्टाचाराचे पालन केले जात नाही. महापालिका हद्दीमध्ये ताथवडे या गावाचा समावेश होतो. सदर ताथवडे या गावाचा भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. त्याचप्रमाणे हा भाग भोर-वेल्हा विधानसभा मतदारसंघात देखील जोडला गेला आहे. पिंपरी महापालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेत राजशिष्ठाचार नुसार बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव टाकले जाते. परंतु भोर-वेल्हा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम अनंतराव थोपटे यांच्या नावाचा समावेश केला जात नाही. ताथवडे हा प्रभाग त्या मतदारसंघाचा जोडला गेलेला असल्यामुळे राजशिष्टाचारानुसार आमदार संग्राम थोपटे यांचे नाव महापालिकेच्या प्रत्येक कार्यक्रम पत्रिकेवर येणे आवश्यक आहे. तरी आमदार आनंदराव थोपटे यांचे नाव महापालिकेच्या सर्व कार्यक्रम पत्रिकेत टाकण्यात यावे अशी मागणी नगरसेवक निलेश बारणे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here