संकल्प निधी संकलन पेटीचे उद्‌घाटन

पिंपरी | मराठवाडा जनता विकास परिषदेच्या केंद्रीय कार्यकारणी सदस्यांची बैठक औरंगाबाद येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेत पार पडली.  या बैठकीत पिंपरी-चिंचवड येथे मराठवाडा भवन बांधण्याचा संकल्प मराठवाडा चॅरिटेबल संस्थेच्या वतीने करण्यात आला आहे. यासाठी निधी संकलन करण्यात येत आहे. या निधी संकलन पेटीचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी निधी संकलन पेटीचे उद्घाटन करण्यात आले. माजी आमदार पंडितराव देशमुख, डी. के. देशमुख, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. प्रदीप देशमुख, मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्यंकटराव काब्दे, प्राचार्य डॉ. के. के. पाटील, सचिव भारत राठोड, अभियंते नागरे, मराठवाडा जनविकास संघाचे पदाधिकारी सुनिल काकडे, शिवकुमारसिंह बायस, नितीन चिलवंत आदी उपस्थित होते.

नितीन चिलवंत यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात राहणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांना आपले हक्काच ठिकाण असावे, या भूमिकेतून मराठवाडा भवन बांधण्यात येणार आहे. ज्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या सभागृहात उद्घाटन केले. ती वास्तू स्वामी रामानंद तीर्थ, गोंविदभाई श्रॉफ व मराठवाडा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांचे पाय लागलेली पवित्र भूमी आहे. त्यामुळे भवन बांधण्याच्या कार्याला एका अर्थाने त्यांची आशीर्वादरुपी मदत मिळाली आहे. या कामास तन मन धनाने मदत करण्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांनी दिल्याचेही चिलवंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here