पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांसह शहरातील विविध विकास प्रकल्पांना उज्जैन महापालिकेच्या प्रशासकीय अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने भेट दिली.
या शिष्टमंडळाचे स्वागत महापौर शकुंतला धराडे यांनी केले. महापौर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या भारती फरांदे, शारदा बाबर, सहाय्यक उद्यान अधीक्षक शरद बगाडे, जोपा पवार, माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी आदी उपस्थित होते.
या अभ्यास दौ-यामध्ये उज्जैन महापालिकेचे उपायुक्त मनोज पाठक, योगेंद्र सिंह पटेल, प्र. सहाय्यक यंत्री चंद्रकांत शुक्ला, स्वास्थ अधिकारी वी. एस. मेहते यांचा समावेश होता. या अभ्यास दौरा पथकाने महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, सत्तारूढ पक्षनेत्या, विविध समिती अध्यक्ष कार्यालये, प्रशासन विभाग, करसंकलन विभाग तसेच मोशी येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व सारथी प्रकल्पास भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली.
यावेळी अभ्यासदौरा शिष्टमंडळास महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पासह सारथी हेल्पलाईन प्रकल्पांबाबत सुधिर बोराडे व किशोर केदारी यांनी सविस्तर माहिती दिली. या अभ्यासदौ-याचे समन्वयक म्हणून उपायुक्त मनोज पाठक व सहाय्यक उद्यान अधीक्षक शरद बगाडे यांनी काम पाहिले.
सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे वतीने अशाच प्रकारे येत्या सोमवारी (दि.10) विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कार्यालयाबरोबरच शहरातील मुख्य चौक/ भुयारी मार्ग/ सर्व उडडाणपुलांची स्वच्छता करणेत येणार असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here