पिंपरी :- पिंपरी चिंचवड शहरात सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज महापालिकेवर मोर्चा काढून ‘घंटानाद’ आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपाचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील आणि विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहरात २५ नोव्हेंबर पासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपा आणि पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असताना देखील केवळ टँकर लॉबीला पोसण्यासाठी ही कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. यावेळी सत्ताधारी भाजप आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनानंतर पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी रामदास तांबे यांना निवेदन देण्यात आले. येत्या ८ दिवसात शहरातील पाणीपुरवठा नियमित आणि सुरळीत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या आंदोलनात युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष नगरसेविका वैशाली काळभोर, मंगला कदम, सुमन पवळे अपर्णा डोके, अनुराधा गोफणे, पौर्णिमा सोनवणे, माई काटे, उषा काळे, प्रज्ञा खानोलकर, संगीता ताम्हणे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, दत्ता साने, अजित गव्हाणे, मयुर कलाटे, प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, मोरेश्वर भोंडवे, विनोद नढे, राजू बनसोडे, संतोष कोकणे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, प्रवक्ते फजल शेख, विशाल काळभोर, तसेच मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here