पिंपरी चिंचवड –   जुन्या भांडणाचा राग मनात धरून सातजणांनी एकाला लाकडी दांडक्याने व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोनजणांना पोलिसांनी अटक केली. तर, सहाजण फरार आहेत. ही घटना रावेत येथील सोनिगरा आंगण सोसायटी जवळ मंगळवारी (दि. 3) मध्यरात्री पावनेबाराच्या सुमारास घडली. संदीप सदवीर चौधरी (वय 38, रा. ट्रान्स्पोर्ट नगरी, निगडी), अरुण मदनलाल पवार (वय 24, रा. सिध्दीविनायक नगरी, निगडी) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. टिटू आणि इतर 5 गुन्हेगार फरार झाले आहेत. सुभाष रणजितसिंग धायल (वय 36, रा. घर नं. 605, एक्वामिस्ट सोसायटी, शिंदे वस्ती, रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष धायल हे मंगळवारी रात्री सोनिगरा आंगण सोसाटीजवळ उभारले होते. त्यावेळी आरोपी वेगवेगळ्या दुचाकींवर आणि एका कारमधून त्याठिकाणी आले. त्यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून सुभाष यांच्याशी शिवीगाळ केली. त्यांना लाकडी दांडक्याने, लोखंडी रॉडने मारहाण केली. उजव्या पायाच्या मांडीवर आणि पोटावर तसेच डाव्या हातावर गंभीर दुखापत केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील त्यांनी दिली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here