पिंपरी – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्याचा व विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने आदित्य बिर्ला ग्रुप, पिंपरी यांच्या वतीने महानगरपालिकेच्या चिंचवड येथील जागेवर उभारण्यात येणा-या स्मारकाच्या नियोजित जागेची पाहणी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे व आदित्य बिर्ला ग्रुप च्या संचालिका श्रीमती राजश्री बिर्ला यांनी केली. यावेळी स्थायी समिती सभापती विलास मडीगेरी, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक नामदेव ढाके, शहर अभियंता राजन पाटील, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे आदि उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने महात्मा गांधी यांच्या स्मारकासाठी जागा देण्यास महासभेने मन्यता दिलेली असून या नियोजित स्मारकाचा खर्च आदित्य बिर्ला समुहाच्या वतीने करण्यात येणार आहे. या कामाला गती देण्यासाठी या नियोजित जागेची पाहणी करण्यात आली. महानगरपालिकेच्या ताब्यातील ६८०६.५८ चौ.मी जागेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे.