साक्री : प्रचिती इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धा आणि परीक्षांमध्ये यश संपादन केले. स्कूलचे अध्यक्ष प्रशांत भीमराव पाटील यांनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.
प्राचार्य अतुल देव आणि शाळेचे व्यवस्थापक तुषार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध स्पर्धा आणि खेळांतून या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या संधीचा पुरेपूर वापर करीत विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. तुषार देवरे, वैभव सोनवणे, कुणाल देवरे यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेत शाळेचा शंभर टक्के निकाल लागला. यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे :
जीके ऑलिम्पियाड परिक्षेत आठवीतील मृदुल पराग चौधरी याने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. भारत सरकार, ऊर्जा मंत्रालयातर्फे ऊर्जा संवर्धन या विषयावर आधारित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत सहावीतील मृणाल अतुल देव हिची निवड झाली आहे. नवोदय परिक्षेत सहावीतील आदिती अजय ठाकूर, रोहन कैलास महाले यांची निवड झाली आहे.
रोप मल्लखांब स्पर्धेत सहा विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. या पैकी सहावीतील नेहा दिनेश गांगुर्डे, अस्मिता रावसाहेब अहिरराव यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे. शिक्षक नितीन राजपूत यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
कराटे स्पर्धेत आठ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात पाच विद्यार्थीनींचा समावेश होत्या. यात सहावीतील दिक्षांत सतीश पाटील, सातवीतील पूरब विरेंद्र टाटीया या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली. शिक्षक शरद पवार यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
बुध्दीबळ स्पर्धेत पाच विद्यार्थीनींसह 10 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात आठवीतील मृदुल पराग चौधरी, सहावीतील कुणाल प्रशांत देसले यांची जिल्हास्तरावर निवड झाली.
खो-खो स्पर्धेत 12 विद्यार्थीनींसह 24 विद्यार्थी सहभागी झाले होते.
रायफ ल शूटींग स्पर्धेत सहा विद्यार्थीनींसह नऊ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात आठवीतील संकेत सुभाष जैन, सोहिल हारूण पठाण, दीप राजेंद्र रेलन, वेदश्री विज्ञानेश्‍वर पाटील, सातवीतील स्वामिनी सुरेश देवरे, आठवीतील दर्शना राजेंद्र कांकरिया यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
फु टबॉल स्पर्धेत 18 विद्यार्थीनींसह 36 विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील 18 विद्यार्थीनींची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सातवीतील स्वामिनी सुरेश देवरे, आठवीतील वेदश्री विज्ञानेश्‍वर पाटील, तानिया विजय रेलन, सातवीतील यशस्वी गिरीष पारख, विना राजेंद्र कांकरिया यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
मैदानी स्पर्धांमध्येही शाळेच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे :
थाळी फे कस्पर्धेत दोन विद्यार्थीनींसह चार विद्यार्थी सहभागी झाले होते. आठवीतील दर्शना राजेंद्र कांकरिया हिची जिल्हास्तरावर निवड झाली. गोळाफेक स्पर्धेत दोन विद्यार्थी सहभागी झाले होते. धावण्याच्या 100 मीटर शर्यतीत दोन विद्यार्थीनींसह चार विद्यार्थी सहभागी झाले होते. आठवीतील नरेंद्र सूर्यभान शिरसाठ याला यात तालुकास्तरीय उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. सहावीतील लुब्धा केतन देसले हिची जिल्हास्तरावर निवड झाली.
धावण्याच्या 200 मीटर शर्यतीत दोन विद्यार्थीनींसह चार विद्यार्थी सहभागी झाले होते. लांब उडी स्पर्धेत दोन विद्यार्थीनींसह चार विद्यार्थी सहभागी झाले होते.
उंच उडी स्पर्धेत दोन विद्यार्थीनींसह चार विद्यार्थी सहभागी झाले होते. सहावीतील शामल अनिल पाटील हिने तालुकास्तरीय उत्तेजनार्थ पारितोषिक पटकाविले. 4 बाय 100 मीटर रिले स्पर्धेत चा विद्यार्थीनींसह आठ विद्यार्थी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here