साक्री : धुळे येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पव्दारा शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या आश्रमित प्रकल्पस्तरीय (जिल्हास्तरीय) क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. साक्री तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत या क्रीडा स्पर्धा झाल्या.
आमदार डी. एस. अहिरे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे सदस्य मधुकर बागुल कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी सभापती टिकाराम बहिरम, सरपंच राजू चौरे, प्रकल्प अधिकारी ए. एम. थोरात, सहायक प्रकल्प अधिकारी डी. सी. ईशी (शिक्षण), नंदुरबार पतपेढीचे अध्यक्ष शरद सोनवणे, तहसिलदार यशवंत सूर्यवंशी (पिंपळनेर) आदी या वेळी उपस्थित होते.
धुुळे प्रकल्पस्तरीय आश्रमीय क्रीडा स्पर्धांमध्ये साक्रीसह, धुळे, शिरपूर , शिंदखेडा तालुक्यातील तालुका स्तरावर विजयी झालेले संघ धुळे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. यात 45 आश्रम शाळांमधून 1098 खेळाडू सहभागी झाले होते. सांघिक व वैयक्तिक मुले व मुली वयोगट 14, 17 व 19 वर्षातील गटात खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल व वैयक्तिक 13 खेळ प्रकारांच्या क्रीडा स्पर्धा दोन दिवसात घेण्यात आल्या.
प्रकल्पस्तरीय (जिल्हास्तरीय) क्रीडा प्रकारात सर्वस्वी धुळे प्रकल्पस्तरीय (आश्रमिय क्रीडा) स्पर्धा अधिकारी ए. एम थोरात, सहायक प्रकल्प अधिकारी बी. डी. भामरे, सहायक प्रकल्प अधिकारी डी. सी. देशी (शिक्षण) धुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य एम. बी. निकम, प्राचार्य डी. बी. बिरारीस, प्राचार्य पी. एस. पोतदार, प्राचार्य जीवन बिर्‍हाडे, क्रीडा समिती प्रमुख सदस्यांमधून अरुण गायकवाड, राहुल कापसे, विजय जाधव, प्रताप वळवी, पी. के. पवार, सुधीर अकलाडे, बाविस्कर, शरद बिरारीस, बी. आर. पाटील, व्ही. आर पाटील, शरद सोनवणे, मनोहर पाटील, मनोज निकम, व्ही. डी. पुंडे, राऊत, यशवंत पाटील, ठाकरे, चौरे, देसाई, बच्छाव, मोहिते, सतीश सोनवणे, प्रविण सोनवणे, एन. आर. मोगे, काशिनाथ महाले, भूषण सोनवणे, मंगेश ठाकरे, संजय अहिरे यांच्यासह शिरसोले, आश्रमशाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी पंच म्हणून, भोजन निवास म्हणून कामकाज सांभाळले.
प्रकल्प अधिकारी ए. एम. थोरात व प्राचार्य एम. बी. निकम यांनी प्रास्ताविक केले. क्रीडा समिती प्रमुख विजय खैरनार यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.
चारही तालुक्यामधून साक्री तालुक्यातील आश्रमशाळांच्या संघाचे वर्चस्व राहिल्यामुळे जनरल चॅम्पियनशीप साक्री तालुक्याला देण्यात आली.
14 वर्षे वयोगट खो-खो स्पर्धा : शिरपूर तालुक्यातील रोहिणी आश्रम शाळेलाच एकमेव विजय प्राप्त करण्यात यश मिळाले. 14 वर्षे वयोगट खो-खो मुली साक्री, तर 14, 17 व 19 वर्षे वयोगट सांघिक मुले व मुली, खो-खो कबड्डी व्हॉलीबॉल व हॅण्डबॉल या सर्व 23 सांघिक खेळ प्रकारात विजेता संघ साक्री तालुक्याचा ठरला. या साक्री तालुक्यातील 23 संघात तालुकास्तरीय शिरसोले रोहोड, आमळी, जेबापूर, म्हसदी, मैदाने, देवळीपाडा, पिंपळनेर, उमरपाटा, शेवी, सामोडे, इंदवे, वरसुस, सुकापूर, वारू, डांगशिरवाडे, जैताने, विहिरगाव आदी आश्रमशाळामधून तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमधून निवडच एकच तालुक्याचा संघ केल्यामुळे 24 सांघिक खेळ प्रकारांपैकी 23 सांघिक खेळ प्रकारात विजेते पद प्राप्त करता आले. एकच विजेतेपद शिरपूर तालुक्यातील रोहिणी शाळेला यश मिळाले याची विभाग स्तरावर निवड झाली. वैयक्तिक खेळ प्रकारात इंदवे, पिली, कुसुंबा, उडामे, निमझरी, चोपडा जिन, असली, माळीच, उमदा, शेवाडे, शिरसोले, रोहाडे, आदी आश्रम शाळेतील खेळाडूंची विभाग स्तरावर निवड झाली आहे.
बक्षीस वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ए. एम. थोरात, प्रकल्प अधिकारी धुळे होते. बाबा हातेकर, उपसभापती रेखा दिलीप बागुल, दिलीप बागुल, सहायक प्रकल्प अधिकारी डी. सी. ईशी, पी. एस. पिंजारी, एस. आर. बोरसे, एस. डी. धनगर, बी. ए. आव्हाड, के. एम. सनेर (शि. वि. अ.) धुळे, प्राचार्य एम. बी. , डी. बी. बिरारीस, पी. एस. पोतदार, जीवन बिर्‍हाडे यांच्या हस्ते विजेत्यांना ढाल, चषक, शिल्प, प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here