धुळे विभागीय आश्रमिय क्रीडा स्पर्धेत धुळे प्रकल्पाने प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे यांच्या मार्गदर्शनाखाली 238 गुण प्राप्त करून  सर्वसाधारण उपविजेता चषक पटकाविला.  महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक द्वारा शासकीय व अणुधानीत विभागीय क्रीडा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शन, गणित आणि कला दालन प्रदर्शन शैक्षणिक वर्ष सन 2019-  2020 चे उद्‌घाटन राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार किरण लहामटे,  अपर आयुक्त गिरीश सरोदे, मित्तल मॅडम,  उपायुक्त प्रदीप पोळ,  प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे, यजमान प्रकल्प अधिकारी संतोष  ठुबे यांच्या उपस्थितीत यांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी, पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.

नाशिक विभागीय आश्रमिय क्रीडा स्पर्धेत यजमान राजूरसह, नाशिक,  कळवण,  तळोदा, धुळे, नंदुरबार, यावल अशा सात प्रकल्पामधून तीन हजार खेळाडू सहभागी झाले होते. यात धुळे प्रकल्पातील 220 मुले आणि 200 मुली असे 57 आश्रम शाळेतून जैताने, आमळी, शिरसोले, चिपली, राईन पाडा, वरसुस, उमरपाठा मैदाने,  कुसुबा, वागाडी, अनेरडॅम, रेवाडी,  उडाने, म्हसदी, सुकापूर, शेवगे, बोपखेल, वारसा, पिंपळनेर, नवापाडा, देवळी पाडा,  रोहड, इंदवे, वालवे,  शिरपूर, लौकी, उमर्दा, सांगवी, असली,  निमझरी,  वासरडी,  वरसुस, सामोडे आदी धुळे प्रकल्पातील प्रकल्प स्तरावर विजेता झालेले 420 खेळाडूंनी नाशिक विभागस्तरावर धुळे प्रकल्पाचे नेतृत्व केले.

 विभागीय आश्रमिय क्रीडा स्पर्धांमध्ये  धुळे प्रकल्पा वैयक्तीक खेळ प्रकारात प्रथम 12 पदक द्वितीय व तृतीय प्रत्येकी 10 पदक असे ऐकून 32 पदक. सांघिक हॅन्ड बॉल, व्हॉलीबॉल, खो खो, कबड्डी व रिले सह प्रथम 4 व द्वितीय व तृतीय प्रत्येकी 8 प्रमाणे 16 पदक एकूण 20 पदक मिळविले.

अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आश्रमिय क्रीडा स्पर्धामध्ये धुळे प्रकल्पाचा 14 व 17 वर्ष वयोगट संघ सहभागी होणार आहे. यात हॅन्डबॉल, जैताने आश्रम शाळा संघ, 14 वर्ष मुली व्हॉलीबाल संघ – आमळी आश्रमशाळा व रिले 4 बाय 100 संघ , 19 वर्ष वयोगट मुली शिरसोले आदी सांघिक खेळ प्रकार व वैक्तीक खेळ प्रकारासह धुळे प्रकल्पाचे 66 खेळाडू व इतर निवड झालेले खेळाडू नाशिक विभागाचे नेतृत्व करतील. 

प्रथमच आदिवासी विकास विभागाने विज्ञान प्रदर्शन व गणित प्रदर्शनसाठी विभागस्तरावर उपकरणे सादर करण्याची स्पर्धा घेण्यात आली. यात, धुळे प्रकल्पाचे जैताने अनेर डम नवा पाडा,  वागाडी  आदी शाळांची निवड झाली. विज्ञान प्रदर्शनात प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुदानित रामराम पाटील आश्रमशाळा जैताने प्रकल्पाने प्रथम क्रमांक मिळविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here