पिंपरी :- लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारीत “पंतप्रधान ते प्रधानसेवक” या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महापालिकाच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह या ठिकाणी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरूण पवार, जय भगवान महासंघाचे जिल्हा अध्यक्ष गणेश ढाकणे, जय भगवान महासंघाचे शिक्षक संघटना अध्यक्ष खंडूजी खेडकर, उपाध्यक्ष हनुमंत घुगे, राजपूत संघटनेचे पुणे प्रवक्ता राजपूत, नेताजी राजपूत, जितेंद्रसिंह राजपूत उपस्थित होते.

दरम्यान, या प्रदर्शनात भारत सरकारच्या नवीन योजनांचा शुभारंभ करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मन कि बात मध्ये साधलेला संवादाची कात्रणे, मोदी यांचे भारतातील विविध राज्यातील विधानसभा रणसंग्रामातील प्रचारक, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध देशातील पंतप्रधान राष्ट्रप्रमुख यांच्या पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट तसेच देशांतर्गत विविध करार, विविध कार्यक्रमाचे केलेले उद्‌घाटन, पंतप्रधान पदाचे उमेदवार लोकसभा निवडणूक २०१४, नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नेतृत्त्व, विदेशातील दौरे यांची छायाचित्रे व वृत्तपत्रातील बातम्यांच्या कात्रणाचा समावेश आहे.

या प्रदर्शनाचे मुख्य आयोजक नितिन चिंलवंत व शिवकुमारसिंह बायस यांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह या ठिकाणी गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी सकाळी १० ते रात्री ८.३० पर्यंत सर्वाणसाठी खुले राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here