पिंपरी पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायट्या, हॉटेल व्यवस्थापनाला कंपोस्टींग खत तयार होणारी यंत्रणा कार्यान्वीत करण्याच्या सूचना पिंपरी-चिंचवड महापालिकेने केल्या आहेत. तरी, शहरातील बहुतांश सोसायट्या, हॉटेल यांच्याकडे अशी व्यवस्था करण्यात आली नसल्याचे आढळले आहे, अशांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे.

महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्वप्ननगरी सोसायटी, अक्षा सोसायटी या दोन सोसायटींना कंपोस्टींग यंत्रणा नसल्याने दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागले आहे. या सोसायटींकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत हॉटेल कलासागरच्या व्यवस्थापनाला देखील पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. अ क्षेत्रीय कर्यालयांतर्गत हॉटेल डबल ट्री व हॉटेल सप्तगिरी यांनाही प्रत्येकी पाच हजार रुपये दंड अकारण्यात आला आहे. असा एकूण 30 हजार रुपयांचा दंड पालिकेने आकारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here