पिंपरी पिंपळे गुरव येथील प्रभाग क्रमांक 9 मध्ये आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली. तब्बल 8 आरसीसी बांधकामे पाडण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि. 11) आणि गुरूवारी (दि. 12) करण्यात आली. पिंपळे गुरव येथील 8 आरसीसी पक्की बांधकामे पाडण्यात आली. अंदाजे 5 हजार 500 चौरस फुटाची बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली. त्यासाठी 1 जेसीबी, 1 डंपर, 10 मजूर, 4 मनपा अधिकारी व 10 मनपा पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here