पिंपरी| शहरातील अवैध बांधकामावरील शास्तीकराचा प्रश्न भाजप सरकारने सोडविला नाही. केवळ जनतेला झुलवत ठेवले होते. आपले सरकार आल्यावर शंभर दिवसांच्या आत शास्तीकराचा प्रश्न सोडवू, असे आपण जाहीर केले होते. आता आपली सत्ता आली असून शहरातील अवैध बांधकामावरील शास्तीकर सरसकट माफ करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

साने यांनी पवार यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकरचा प्रलंबीत प्रश्न आहे. मागील भाजप सरकारने अश्वासने देऊन झुलवत ठेवले. मात्र, हा प्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे शहरातील जनतेची निराशा झाली आहे. आपले सरकार आल्यावर शंभर दिवसांच्या आत शास्तीकराचा प्रश्न सोडवू, असे जाहीर केले होते. त्यानुसार आता सरसकट शास्तीकर माफ करून शहरवासीयांना दिलासा द्यावा, अशी विनंती साने यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here