कामशेत : कामशेत येथील महामार्गावरील बनविण्यात येत असलेल्या उड्डाणपुलाच्या कामास या पुलावर कामकरणाऱ्या पोट ठेकेदाराकडून अडथळे निर्माण केले जात असल्याने पुलाच्या कामास विलंब झाल्याचा पुलाचे ठेकेदार असलेल्या निर्माण कंट्रक्शन कंपनी कडून सांगण्यात येते आहे .
जुना मुंबई पुणे महामार्गावर मागील तीन वर्षांपासून सुरु असलेले उड्डाणपुलाचे काम वेळेत पूर्ण होत नसल्याने या पुलाचे काम करणाऱ्यांवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते तसेच अनेक राजकीय पक्षांनी याठिकाणी आंदोलने देखील केल्याने मागील तीन वर्षात कामशेत चा उड्डाणपूल कायम चर्चेत होता , एवढे आरोप होत असताना देखील अध्याप पर्यंत या पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने त्याची बाजू मांडलेली नव्हती , मात्र मंगळवारी (दि.१० ) निर्माण कंट्रक्शन कंपनीचे मालक अरुण पाटील यांनी या सर्व आरोपांना दुजोरा देत भ्रष्टाचाराचे आरोप करणारे पोट ठेकेदार दिनेश देशमुख यांच्या कडून पुलाच्या कामास पैश्याच्या हव्यासापोटी अडथळे निर्माण केल्याने पुलाचे काम मुदतीत पूर्ण होऊ शकले नाही , परंतु सध्या स्थितीत या उड्डाणपुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून ३१ जानेवारी पर्यंत पुलाचे काम आम्ही पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उड्डाणपुलाचा ठेका घेतलेल्या अरुण पाटील यांच्या निर्माण कंट्रक्शन या कंपनीकडून दिनेश देशमुख यांना पुलाच्या व्ही .यु.पी च्या सेंटरिंग चे काम देण्यात आले होते मात्र दिनेश देशमुख यांना दिलेले काम ते वेळेत सुरु करण्यास टाळाटाळ करून त्यांनी दहा लाख रुपयांची उचल निर्माण कंट्रक्शन यांच्याकडे मागितली व त्यानंतर कामास सुरवात केली , त्यानंतर त्याने करारातील अटीचा वारंवार भंग करून निर्माण कंट्रक्शन कडून अवाजवी पैश्यांची मागणी केली व तेथून वादास सुरवात झाली व पोट ठेकेदाराकडून निर्माण कंट्रक्शन कडे ५० लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली , तेव्हा निर्माण कंट्रक्शन कडून पोलिसांना तक्रार करून पोलीस संरक्षणाची मागणी करून पुढील कामास सुरवात करण्यात आली व पुढील काम केले मात्र या पोट ठेकेदाराने पुलाचे स्लाप चे काम सुरु असताना २० -२५ गुंड आणून कामात अडथला आणला तरी देखील निर्माण कंट्रक्शन कडून पोलीस संरक्षणात स्लॅप चे काम पूर्ण करण्यात आले . त्यानंतर हा स्लॅप पडणार असल्याची चर्चा पसरवून परीसारील नागरिकांना भयभीत केले मात्र अध्याप पर्यंत स्लॅप टिकून आहे एकंदरीतच पोट ठेकेदाराने कामात वेळोवेळी अडथळे आणल्याने व ब्लॅकमेलिंग केल्याने या कामास उशीर झाला असल्याचे निर्माण कंट्रक्शन चे अरुण पाटील यांनी आमदार सुनील शेळके यांना निवेदन देऊन कामशेत येथील उड्डाणपुलाच्या कामच्या विलंबा बाबत स्वतःची बाजू मांडली आहे.